Spread the love

मावळ : प्रतिनिधी

मावळ लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मतदान करा. मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांशी खूप जुने नाते आहे. गेल्या दहा वर्षात मावळ लोकसभेत काही कामे झालेली नाहीत. त्या समस्या सोडविण्याचे काम आपण करु. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. चांगल्या पद्धतीने काम होईल, ही माझी जबाबदारी आहे. तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही देत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदारांना साद घातली.

 

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या गावभेट दौ-यास मतदार संघातील कार्यकर्त्यांन सोबत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी वाघेरे पाटलांचे मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक दत्ता वाघेरे, सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप, जिल्हा संघटिका शैलजा खंडागळे, भाऊसाहेब पानमंद, भारती राक्षे, शिवाजी राक्षे, सुरज राक्षे, दशरथ राक्षे, बाळासाहेब आंब्रे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गाव भेट दौऱ्यात सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, कुसगाव, पाचाने, राजेवाडी, दिवडे, ओव्हळे, डोणे, आढले ब्रु, आढले खु, चांडखेड, बेबड – ओहळ, परंदवडी आदी गावांमधून संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचार गावभेट दौरा उस्फुर्तपणे पार पडला. यावेळी गावागावातून वाघेरे पाटील यांची मिरवणूक काढून, फटाके वाजवून संजोग वाघेरे पाटलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आता फक्त “बदल घडणारच” असा निर्धार मावळ वासियांनी या वेळी केला.

 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा डोळयासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे “एकच ध्यास, मावळचा विकास” अशी ओळख कायम राखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील गावभेट दौऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारांना केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *