पिंपरी : प्रतिनिधी
जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण त्यांच्या योगदानातून झाली. पिंपरी चिंचवड शहराच्या पायभरणीत सर्वात मोलाचा वाटा इथल्या कष्टकरी, कामगार वर्गाचा आहे. कामगार दिनी त्याचे स्मरण प्रत्येकाला झाले पाहिजे, असे मत मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मांडले.
संभाजीनगर येथील बर्ड-व्हॅली उद्यान येथील वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थित राहून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि वडार मजूर शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वडार समाज महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला.
या वेळी वडार समाज ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शाम बाबू पवार, उपाध्यक्ष बाळू मोरे, कार्याध्यक्ष मारुती धोत्रे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. भारत निंबाळकर, सुरेश विटकर, सुरेश धोत्रे, राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी तज्ञ समितीचे सदस्य विनायक लष्कर, दत्ता देवतारासे, शिवसेना विभाग प्रमुख सतीश मरळ, दिलीप दातीर, राहुल दातीर पाटील, अमित बाबर, शामराव विटकर, राजीव कुसाळकर, अनंत नलावडे, अनिल विटकर, सागर ओरसे, सचिन चौगले, प्रमोद चौगुले, नागेश पवार, अमर दौंडकर, राहुल दौंडकर लखन पाठकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान व इतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच, पिंपरी चिंचवड शहर विकसित होत असताना वडार समाजाचा मोलाचा वाटा आहे. वडार समाजाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम व पथदर्शी आहे. पिंपरी चिंचवड शहर निर्मातीचे काम वडार समाज बांधवांनी केले आहे. या समाजाने केलेल्या कार्यामुळेच संभाजीनगर येथील बर्ड-व्हॅली उद्यानामध्ये वडार दापत्य शिल्प साकारले आहे.