तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथे 10 वा आंतरराष्ट्रीय ‘योगा डे’ तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने योगा करून साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ‘योगा डे’ निमित्त उपेंद्रजी उंडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच शहरातील सर्व ज्येष्ठ, पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्रआप्पा भेगडे, तळेगांव दाभाडे शहर भाजपा अध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे, माजी नगरसेवक अरुणभाऊ भेगडे, सचिनभाऊ टकले, शोभाताई भेगडे, सरचिटणीस स्वप्निल भेगडे, अतिश रावळे, भाजपा तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष विनायकदादा भेगडे, तळेगांव दाभाडे शहर गांव विभाग भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभाताई परदेशी, युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव गुंड, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित, भाजपा माजी प्रभारी वैभव कोतुळकर, भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे अध्यक्ष अनिलजी वेदपाठक, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष काकासाहेब शिळीमकर,कामगार मोर्चाचे सरचिटणीस तुकाराम आखाडे, सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषिकेश सुतार,भाजपा तळेगांव दाभाडे शहर सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष गणेशजी उंडे,भाजपा सदस्य ललित गोरे,कामगार मोर्चाचे जगुदादा,जालिंदर वनवे, भाजपा तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विविध आघाडीचे, मोर्चाचे, महिला पदाधिकारी, जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
योगाभ्यासक उपेंद्रजी उंडे यांचा शहर भाजपच्या वतीने शाल देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले.