तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील इंद्रायणी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन प्रसन्न सकाळी उत्साहात पार पडला. विज्ञान शाखेचे प्राध्यापक शिवाजी जगताप यांनी आणि किशोर शेवकर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविली. प्राध्यापक जगताप यांनी योगाविषयी सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थी व प्राध्यापकांना केले.
महर्षी पतंजली यांनी योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये आसन, प्राणायाम,ज्ञानसाधना यामुळे धकाधकीच्या जीवनात आपल्यामधील ताण-तणाव कमी करण्यास योग साधनेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो आहे असे जगताप सर यांनी सांगितले. त्यांनी उभ्या स्थितीतील सूर्यनमस्कार,ताडासन,वृक्षासन, अर्धचक्रासन ,त्रिकोणासन ,तसेच बैठक स्थितीतील वज्रासन, शशकासन, अर्धउष्ट्रासन ,पश्चिमोत्तासन, वत्रासन ,पद्मासन, अर्धपद्मासन, अर्धहलासन,शलभासन सर्वांगासन ,पूर्णहलासन ,शीर्षासन, अनुलोम विलोम , भ्रामरी इत्यादी अनेक आसनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली. याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य. प्राध्यापक गुलाब शिंदे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.पी.भोसले गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी योग प्राणायाम आसन केली.या उपक्रमाचे
प्राचार्य डॉ.संजय आरोटे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी प्रशंसा केली.सूत्रसंचालन करताना प्रा. डोके सरांनी म्हटले की २०१४ ला युनो मध्ये १७५ देशांनी योगाच्या प्रस्तावाला संमती दिली व १९३पैकी १७५ देशांनी २१ जून २०१५ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगात उत्साहात साजरा केला .भारताने संपूर्ण विश्वाला योग ही दिलेली मोठी देणगी आहे. योगाचा प्रचार व प्रसार अनेक देश मोठ्या प्रमाणात करत आहे. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका प्रतिभा गाडेकर क्रीडा शिक्षक अश्फाक मुलाणी यांनी केले. योगिनी हुलावळे यांनी मानले.