बीड : प्रतिनिधी
शिवसंग्राम चे नेते पांडुरंग आवारे-पाटील यांचा काही दिवसापूर्वी बीड तालुक्यातील चौसाळा येथे अपघात झाला होता. आज दि.22 ज्यून 2024 रोजी बीड विधान सभेचे आमदार संदीप भैय्या श्रीरसागर यांनी पांडुरंग आवारे-पाटील यांची मानेवाडीतील निवासस्थांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बीड ता अध्यक्ष बाळासाहेब गोरे,पी वाय जोगदंड सर,श्रीमंत सोनवणे,बाळासाहेब राऊत,मानेवाडीचे मा सरपंच अनिल टाके, उपसरपंच स्वामी माने,ग्रा.प.सदस्य शिवाजी माने सर, ग्रा.प.सदस्य नवनाथ मोरे, समाज सेवक दिगांबर तात्या आवारे व मानेवाडीतील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
About The Author
