Spread the love

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ शाळेसाठी आरक्षीत असेलेली जागेत क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) सुरू करावी. सदर जागा खासगी संस्थेला वापरासाठी देण्यात तीव्र विरोध आहे, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे.

 

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे चऱ्होली आरक्षण क्रमांक २/ ९२ मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये प्रशासनाने क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) विकसित करावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने गावे सामाविष्ट झाली. त्यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी या गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी २०१७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

 

समाविष्ट गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात विकासाला चालना देण्यात आली. त्यामुळे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला आहे. लोकसंख्या आणि गृहप्रकल्प वाढले आहेत. स्थानिक खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे आणि हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे. या करिता महापालिका प्रशासनाने चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ याठिकाणी क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) सुरू करावे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

 

चऱ्होलीतील खासगी संस्थेला सदर भूखंड वापरण्यास व शाळा बांधण्यास प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, समाविष्ट गावांतील २० वर्षांचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्याच्या दृष्टीने सदर भूखंड खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला माझा तीव्र विरोध आहे. सदर कार्यवाही तात्काळ रद्द करावी, अशी आग्रही मागणी आहे. याबाबत सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *