Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

पावसाळा सुरू असताना शहरात साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून अशातच शहरात डेंगू रुग्णांची संख्या देखील वाढत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, आदी ठिकाणी पाणी साठवले जातेय त्या साठवलेल्या पाण्यात डेंगू डासउत्पत्ती वाढत असून, संबंधित याकडे दुर्लक्ष करीत असून, या हलगर्जीपणामुळे शहरातील डेंगू रुग्णाची संखेत झपाट्याने वाढ होत असून , याचा परिणाम म्हणून आपल्या आरोग्य यंत्रणेवर होत असून, पर्यायी रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बेड, व औषध उपलब्ध होत नसून नागरिकांना या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा देखील तुटवडा भासत आहे, हि खूप गंभीर बाब असून, पाण्याची साठवणूक करून योग्य ती काळजी न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यावर योग ती कडक कारवाई कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

 

शहरातील डेंगू बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहता, आपल्या आरोग्य यंत्रणेची परीस्थितीचे व आजाराचे गांभीर्य पाहता यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात व शहरातील डेंगू या आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश देण्यात यावे तसेच विविध आस्थापनांची तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे सूचित करण्यात यावे तसेच या डेंगू बाधित रुग्णांवर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्यात यावे, अशी मागणी मा विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे एका पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *