Spread the love

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले गट) पिंपरी चिंचवड शहरसंघटक अक्षय दूनघव यांच्या पुढाकाराने लांडेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

लांडेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जमदाड तसेच अक्षय दुनघव यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. यानंतर परिसरात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची हलगीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अबालवृद्धांसह सुमारे 300 महिला सहभागी झाल्या होत्या.

 

कृष्णा जाधव, बळीराम गालफाडे, बापू सरवदे, बाबू पाटोळे, गोविंद खंडागळे, सचिन काळे, आशा पवार, कांचन दूनघव, रेखा जाधव, अश्विनी धूतडमल, लक्ष्मी थोरात, शकुंतला दुनघव आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *