Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे, केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही.

तसेच मालवण येथे सरकारने अहोरात्र काम त्वरित करून राजकोट किल्ल्यावर युगपुरूष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा सरकारकडून पुन्हा उभारण्यात यावा व अशी दुर्घटना भविष्यात घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने करत आहोत.असे पिंपरी चिंचवड शहर तहसीलदार यांचे कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

यावेळी आमदार आण्णासाहेब बनसोडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, मोरेश्वर भोंडवे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट,युवती अध्यक्ष वर्षा जगताप, मा. शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, मा.नगरसेवक सतीश दरेकर, मा.नगरसेवक प्रकाश सोमवंशी, मा. विरोधी पक्षनेते संतोष बारणे,माजी नगरसेविका माया बारणे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाने, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माच्छरे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ,माजी नगरसेवक निलेश पांढारकर, प्रसाद शेट्टी, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, अकबर मुल्ला, संगीता कोकणे, पल्लवी पांढरे, ज्योती गोफणे, सविता धुमाळ, आशा मराठे, मीरा कदम, मेधा पळशीकर, रिजवाना शेख, मीनाक्षी शिंगाडे, रविंद्र ओव्हाळ, रशीद सय्यद, शक्रूल्ला पठाण, अभिजित आल्हाट, बाळासाहेब पिल्लेवार, प्रदीप गायकवाड, रामप्रभू नखाते,रमजान सय्यद, निलम कदम, विक्रम पवार, पवन जवळकर, राजीव क्षीरसागर

धनाजी तांबे, सुनील अडागळे इत्यादी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *