Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवकांसाठी युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे, जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुथ स्तरावर जाऊन शासनाच्या योजनांची माहिती पोचवण्याचे काम अधिक प्रभावीपणे करावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. चिंचवड विधानसभा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशन आज वाकड येथे पार पडले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष शंकर जगताप बोलत होते. प्रसंगी, महायुती सरकारने महिला भगिनींसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रोत्साहित होवून 120 महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

यावेळी, प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषा ढोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरलमल, मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे, भाजपा उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, बिभीषण चौधरी, भारती विनोदे, अजित कुलथे, मधुकर बच्चे, संदीप गाडे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, सागर आंघोळकर, नीता पाडाळे, हरीश मोरे, शोभा जांभूळकर, पल्लवी वाल्हेकर, पियुशा पाटील यांच्यासह चिंचवड विधानसभेतील‎ ‎प्रदेश पदाधिकारी,‎ नगरसेवक – नगरसेविका,‎ जिल्हा पदाधिकारी,‎ मोर्चा‎ / आघाडी‎ / प्रकोष्ठ‎ प्रमुख,‎ मंडल अध्यक्ष,‎ मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र‎ प्रमुख, बुथ प्रमुख‎ व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रसंगी, आमदार अश्विनी जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

माजी राज्यमंत्री संजय भेगडे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या राजकारणात पिंपरी चिंचवडचा प्रभाव राहिला आहे. राज्यातील पहिले विधानसभा अधिवेशन चिंचवड येथे पार पडत आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात दोन महत्वाच्या निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीतही चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुका महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे. विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरविण्यात येत आहेत. त्यांना वेळीच सामोरे जावून उत्तरे द्या. शंभर टक्के मतदार टक्का वाढविण्यासाठी आतापासून बुथ प्रमुखांनी कामाला लागा, असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंचवड विधानसभा संयोजक काळूराम बारणे यांनी केले. शोक प्रस्ताव शशिकांत कदम यांनी मांडला. नवमतदार नोंदणी अभियान व मतदार यादीचा अभ्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन, महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना व संविधान जागर, लाडकी बहिण योजना, पिंपरी चिंचवड मनपा मध्ये भाजपने केलेली विकासकामे व शहराच्या हितासाठी घेतलेले निर्णय याबाबत माजी महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके, राजेंद्र राजापुरे, मनोज तोरडमल, बिभीषण चौधरी यांनी ठराव मांडून त्यांना अनुमोदन देण्यात आले. सुत्रसंचलन मोरेश्वर शेडगे तर आभार संदीप कस्पटे यांनी मानले.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा‎ विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन‎ वाकड येथे घेण्यात आले. मावळ लोकसभा निवडणुकीत चिंचवडमधून महायुतीच्या उमेदवाराला ७५ हजाराहून अधिक मताधिक्क्य मिळाले. चिंचवड विधानसभा आमदार महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला आहे. त्यासाठी प्रभावीपणे सदस्य नोंदणी आणि मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

 

  • -शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *