Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

वडगाव आणि मावळ परिसरातील हजारो नागरिक बंधू भगिनी, बाळ गोपाळ हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथक लोणावळा यांनी पटकावला. वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या भव्य प्रांगणात आकर्षक रुपये – ७,७७,७७७/- रोख बक्षिस तसेच बाल कलाकारांचे विविध नृत्याविष्कारासह हा दिमाखदार सोहळा – मुंबई, पनवेल, लोणावळा, येथील सात गोविंदा पथकांचे नियोजनबद्ध, हर्षोल्हासात आणि जोशपूर्ण वातावरणात पाच/सहा/सात – थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली.

मावळ गर्जना प्रतिष्ठान-वडगाव मावळ चे वतीने दरवर्षीप्रमाणे शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे, आणि हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रात्री- १०:०० वाजता दहीहंडी फोडण्यात आली. एकच जल्लोष झाला. जय भवानी जय शिवाजी ! गोविंदा रे गोपाळा ! गणपती बाप्पा मोरया! या जयघोषणांनी आसमंत निनादला.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहीहंडी पूजन करून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती मावळ माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव भाजपा अध्यक्ष वडगाव ग्रुप ग्रामपंचायत मा. सरपंच संभाजी म्हाळसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे, पुणे जिल्हा ओबीसी (श.प.गट) अध्यक्ष अतुल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस युवा मोर्चा अध्यक्ष विशाल वहिले, पुणे जिल्हा (श.प.गट) सरचिटणीस, उद्योजक सुनील शिंदे, मावळ ग्रामीण पत्रकार संघ माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमारे, मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आणि रुपेश म्हाळसकर (मा.अध्यक्ष मनसे मावळ) यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध संपन्न होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यास भेट देण्यासाठी वडगाव तसेच मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गणेश काकडे – मा.उपाध्यक्ष तळेगाव नगर परिषद, किरण माळसकर- मा.नगरसेवक वडगाव नगरपंचायत, राहुल ढोरे – मा.उपनगराध्यक्ष वडगाव नगर पंचायत, चंद्रजीत वाघमारे – मा.उपनगराध्यक्ष वडगाव नगर पंचायत, राजेंद्र कुडे – मा.उपनगराध्यक्ष वडगाव नगर पंचायत, गणेश विनोदे – जेष्ठ पत्रकार / मा.अध्यक्ष मावळ पत्रकार संघ, प्रसाद पिंगळे – मा. नगरसेवक वडगाव नगरपंचायत, रोहीत लांघे – मा.नगरसेवक तळेगाव नगरपरिषद, सुनिल कारंडे – मा.नगरसेवक तळेगाव नगरपरिषद, आशिष खांडगे – मा. अध्यक्ष – तळेगाव शहर युवा आघाडी, अजय भवार – संस्थापक अध्यक्ष – जनहित चारीटेबल, नितीन कुडे – मा.सरपंच वडगाव ग्रामपंचायत, अनिल ओव्हाळ – उपप्रमुख शिवसेना मावळ (उबाठा), त्याचप्रमाणे सायली म्हाळसकर यांच्या सूत्रबद्ध नियोजनानुसार महिला भगिनींचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सायलीताई बोत्रे – अध्यक्ष भाजप मावळ महिला आघाडी, सीमाताई आहेर – अध्यक्ष भाजप नाणे मावळ महिला आघाडी, पूजाताई पडवळ – सरपंच वेहेरगाव, अनुराधा शिंकारे -कायदेतज्ञ मुंबई हायकोर्ट, मीनादीदी गुप्ता – साधक प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, रेखा भेगडे – पत्रकार सतर्क महाराष्ट्र न्यूज, सुनंदा म्हाळसकर – अध्यक्ष बचत गट वडगाव, पूजा वहिले – उपनगराध्यक्ष वडगाव, माया चव्हाण – उपनगराध्यक्ष वडगाव, पूनम जाधव – उपनगराध्यक्ष वडगाव, कल्पना पगडे, ज्योती चव्हाण, अश्वीनी म्हाळसकर, रुपाली क्षीरसागर आदी उपस्थित होते.

वडगाव शहरातील जेष्ठ नागरीक संघानेही या सोहळ्यास उपस्थित राहून सक्रीय सहभाग नोंदवला. उपस्थित सर्वांचे स्वागत सायली म्हाळस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन – तानाजी तोडकर यांनी केले. दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी – सुरज भेगडे, सुरेश जाधव, संतोष म्हाळस्कर,मच्चीन्द्र मोहिते,सागर शेलार,विकास साबळे, प्रणव म्हाळस्कर, अनिल नायर, गणेश भांगरे, ओंकार भांगरे, शुभम म्हाळस्कर, गणेश मालपोटे, जयंत कुंभार, नवनाथ शिवेकर, महेंद्र शिंदे,रोहीत कोळी, संग्राम भानुसघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *