


तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
जनरल हॉस्पिटलचे आद्यसंस्थापक डॉक्टर भाऊसाहेब सर देसाई यांच्या 51 व्या स्मृतिदिनी- डॉक्टरांच्या समाधी समोरील पवित्र स्थळी- तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या वतीने भाऊसाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे चेअरमन शैलेशभाई शहानी हॉस्पिटलच्या भविष्यकालीन विविध प्रकल्पाची माहिती उपस्थितना दिली.
याचबरोबर संस्थेच्या विविध विभागात कार्यरत असणाऱ्याचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं. यानंतर नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉक्टर शालिग्राम भंडारीनी डॉक्टर भाऊ साहेबांच्या वैद्यकीय प्रवासातील समर्पित जीवन प्रणालीचा आलेखच विद्यार्थ्यांसमोर उभा केला. पुरुषोत्तम सूक्त असलेला भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय विद्यार्थिनींनी सादर करून आपली श्रद्धांजली व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, कोषाध्यक्ष श्रीमान विनायकजी अभ्यंकर, संचालक हेमंत सरदेसाई, नितीन सरदेसाई आणि सरदेसाई परिवारातील सदस्य- नर्सिंग स्कूलच्या प्रिन्सिपल मोनालिसा मॅडम आणि सर्व लेक्चरर- नेत्र तज्ञ डॉक्टर कल्पिता मॅडम व्यवस्थापिका संगीता मॅडम या या सर्व उपस्थितनी समाधीस पुष्प अर्पण करून भाऊसाहेबांना आदरांजली समर्पित केली. स्मृतिदिनाचं औचित्य साधून नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींसाठी- व्यक्तिमत्व विकास या विषयावर रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांनी व्याख्यान आयोजित केलं होत. रोटरी अध्यक्ष रोटेरियन कमलेश कारले यांनी प्रमुख व्याख्याते डॉक्टर सुमेधा भोसले- श्रीमान मनोज गोखले तथा सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनही केले.
व्यक्तिमत्व विकासावर आधारलेला– जवळजवळ दोन तास विद्यार्थ्यांशी चाललेला हा अभ्यासपूर्ण संवाद शंभर टक्के यशस्वी झाल्याचं- विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलसत असलेल्या समाधानात प्रतीत होत होता!प्रकल्प अधिकारी रोटेरियन दीपकभाई शहा यांनी व्याख्यात्यान बरोबरच उत्तम विद्यार्थी वर्ग आणि अद्य यावत सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांचे आभार मानलेत. डॉक्टर शालिग्राम भंडारींनी पालकमंत्री या नात्याने समयोजित संगीत, काव्यपंक्ती, शेरोशायरीने विद्यार्थ्यांना उत्साही करीतच, रोटरी क्लब विषयी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण असलेला उपक्रम यशस्वी होण्यास नर्सिंग स्कूलच्या कार्यक्षम प्राचार्य मोनालिसा मॅडम आणि त्यांचा सर्व शैक्षणिक, व्यवस्थापकीय कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळेच यशस्वी झाला. अशा भावना डॉक्टर भंडारांनी व्यक्त केल्या.