Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

शिक्षण हे बदलत्या काळासोबत बदलत असते आणि असे बदल घडविणारे तज्ञ शिक्षण संस्थाना दरवर्षी महाराष्ट्र स्कूल मेरिट ज्युरी अवॉर्ड तर्फे पुरस्कृत केले जाते. शिक्षण क्षेत्रातला हा अतिशय एक मानाचा पुरस्कार आहे.

महाराष्ट्र स्कूल मेरिट अवॉर्ड दरवर्षी अशा नाविन्य निर्माण करणाऱ्या शिक्षण संस्थांना पुरस्कृत करते .चैतन्य इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल इंदोरी ला या वर्षीचा हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा हॉटेल ललित इंटरनॅशनल मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला भारतभरातून उपस्थित टॉपच्या आयसीएससी , सीबीएसई, आयबी स्कूल उपस्थित होत्या. तसेच देशभरातून शिक्षण क्षेत्रात काम करणारी तज्ञ , प्राचार्य , संस्थाचालक, शिक्षक हजर होते. महाराष्ट्र स्कूल मेरिट अवॉर्ड ह्या समिटमध्ये वेगवेगळ्या विषयावर तज्ञांनी आपली मते मांडली. ज्यामध्ये येणाऱ्या नवीन काळामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या संधी, प्रश्न तसेच मानसिक व सामाजिक आरोग्य यावर चर्चा करण्यात आली. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांच्या मनावर येणारा ताण, तणाव कसा कमी करण्यात येऊ शकतो, तसेच आजचा विद्यार्थी हा नैराश्याच्या आहारी गेला नाही पाहिजे यावर चर्चा पार पडल्या. बदलती शिक्षण पद्धती ही थेरी नॉलेज पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज वर जास्त आधारलेली आहे तसेच पारंपारिक विषय आता काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत असे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी मांडले. चैतन्य इंटरनॅशनल च्या उपप्राचार्य रत्नमाला कापसे यांनी शाळेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकृत केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *