‘कहानी और कला का संगम जम्बो के संग “हनुमान शौर्यगाथा’ आणि मैत्रीच्या, नाटकांनी व नृत्यांनी जिंकली रसिकांची मने
ताथवडे : प्रतिनिधी
वाकड येथील पोदार इंटरनॅशनल शाळेचे सातवे वार्षिक स्रेहसंमेलन ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या सृजनशीलतेचा आणि कलागुणांचा आविष्कार केला. पहिल्या दिवशीच्या ‘कहानी और कला का संगम जम्बो के संग खेहसंमेलनास डॉ. किशोर गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अॅग्नेल काव्हॅलो यांनी त्यांचे स्वागत केले. छोट्या गटातील मुलांनी ‘कहानी और कला का संगम जम्बो के संग’
या विषयावर विविध नृत्यांनी उपस्थितांची भरभरून दाद मिळवली. दुसऱ्या दिवशी प्राथमिक विभाग यांनी ‘हनुमानाची शौर्यगाथा व तिसऱ्या दिवशी माध्यमिक विभाग यांनी मैत्री’ या विषयावर नाट्य, नृत्य आणि गाणी सादर करून या विषयांवर अधिक प्रकाश टाकला.
प्राथमिक विभागाने हनुमान की शौर्यगाथेचे तीन प्रयोग सादर केले. पहिल्या प्रयोगासाठी डॉ. अतुल दायमा, दुसऱ्या प्रयोगासाठी अजिंक्य येले (सह कमिशनर पिंपरी चिंचवड) व तिसऱ्या प्रयोगासाठी सेंट व्हिनसंट स्कूलचे व्यवस्थापक रेव्ह. फादर व्हालेंट फर्नाडिस हे प्रमुख पाहुणे होते. तसेच तिसऱ्या दिवशी मैत्री’ या थीमचे तीन प्रयोग झाले. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमाप्पा रुदगी, महाराष्ट्र पोलीस दल ट्रेनिंग विभागाचे इन्स्पेक्टर संतोष पाटील, डॉ. अमित लवेकर तसेच पोदार पुणे विभाग एक व दोनचे व्यवस्थापक फ्रैंकलिन डी. एस. जे व मनोज काळे उपस्थित होते. त्याचबरोबर पुण्यातील इतर पोदार शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पोदार इंटरनॅशनल शाळेचे मुख्याध्यापक अॅग्नेल कार्व्हलो आणि उपमुख्याध्यापिका रचना सोनवणे यांनी केले.
दोन्ही विभागातील प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी संगीत वादनाचा सुंदर कार्यक्रम करून आपल्यातील प्रतिभेचे प्रदर्शन केले. कार्यक्रमात उत्तम नृत्याविष्कार तसेच सुंदर नाटकातून सर्वांचे मनोरंजन करून दोन्ही विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीमध्ये ९०% च्या वरील १४ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या शानदार कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अॅग्नल कार्व्हलो सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्याध्यापिका रचना सोनवणे, समन्वयक नेहा वशिष्ठ, दिपाली कुलकर्णी, सीमा महाजन, सांस्कृतिक विभाग प्रमुख तनय खाबिया तसेच समीर देशमुख व इतर शिक्षक, समीर इनामदार व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे रंगमंचावर नाट्यकृती सादर करण्यासाठी भारती पाटील, गणेश झडे, युवराज शेळके, रोशनी हजारे, मार्गरेट स्वामी, आदिती धावले, सुवर्णा क्षीरसागर व इतर शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर पृथ्वीराज येलोल, गौरव द्यानी मिस काव्या खत्री, तन्वी जंगम, काव्या शर्मा, सई पाठक, सान्वी शिरवाडकर दित्वी नागला यांनी केले व कार्यक्रमाची यशस्वी सांगता शाळेचा हेड बॉय मास्टर अथर्व शर्मा व हेड गर्ल मिस इशिता भोले हिने केले.