चिंचवड : प्रतिनिधी
चिंचवड विधानसभेची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला जागा मिळाली नसल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नाना काटे यांनी चिंचवड मतदार संघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी नाना काटे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आग्रह केला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नाना काटे आज सोमवार (दि. 28) रोजी दाखल करणार असा निर्णय घेण्यात आला असून नाना काटे यांच्या वतीने पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती ही निवडणूक लढविताना त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे चिंचवड मतदार संघातील बहुसंख्य नगरसेवक पदाधिकारी राहतील, असे नाना काटे यांचा वतिने सांगण्यात आले.
आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, संतोष कोकणे, विनोद नढे, उषा काळे, निलेश डोके, शिरीष आप्पा साठे, दिलीप आप्पा काळे शाम जगताप, सचिन काळे, नवनाथ नढे, तानाजी जवळकर, बापू कातळे , प्रशांत सपकाळ, सागर कोकणे, संगीता कोकणे, मीरा कदम, प्रसाद लिम्हण,व इतर पदाधिकारी उपस्तित होते, उद्या सकळी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर पासून सकाळी ९.०० वाजता पदयात्रा निघून रहाटणी मार्गे काळेवाडी मार्गे ग प्रभाग कार्यालय येथे अर्ज दाखल करण्यात येईल.