तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद मधील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी मुरलीधर (अनिल) टकले यांच्या सेवापुर्ती व आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वंदना गरुड यांच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याधिकारी ममता राठोड, सहायक नगर रचनाकार विश्वजित कदम, कलापिनीचे अध्यक्ष डॉ. अनंत परांजपे तसेच संघटनेचे माजी अध्यक्ष रविंद्र काळोखे,अभिषेक शिंदे उपस्थित होते. अनिल टकले यांची नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये मुकादम म्हणून ३८ वर्षे सेवा पूर्ण केली आहे. तसेच कर्मचारी पतसंस्थेच्या विविध पदांवर काम केले असून सध्या ते कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. आपल्या सेवापुर्तीनिमित्त तसेच त्याची कन्या कु.ज्ञानदा मुरलीधर टाकले हिने नगर परिषदेच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले निमित्त टाकले यांनी नगर परिषदेच्या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेंचा अभ्यास करीत असलेल्या युवकांना वीस हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. तसेच दहा सफाई कर्मचारी महिलांना सेवानिवृत्ती व दिवाळी निमित्त साड्या वाटप केले.
सफाई कर्मचारी वंदना गरुड यांनी आपल्या २६ वर्षाच्या सेवेमध्ये अत्यंत प्रामाणिक पणे काम केलेबद्दल सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले. तर नियोजन प्रवीण माने आणि सिद्धेश्वर महाजन आणि कर्मचारी यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती यांचे कुटुंबीय, स्नेही, मित्रपरिवार आणि नगर परिषद कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.