पिंपरी : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाचे माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन महायुतीच्या वतीनं भाजपला ही जागा देण्यात आली आहे. त्यामुळं या जागेसाठी आग्रही असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीमधील प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, निलेश डोके, प्रभाकर वाघेरे, संतोष बारणे, मयुर कलाटे, उषामाई काळे, स्वाती माई काटे, सतिश दरेकर, नारायण बहिरवडे, राजेद्र साळुखे, हरिभाऊ तिकोणे, माऊली सुर्यवंशी, श्रीधर वाल्हेकर, राजु बनसोडे दिलीप आप्पा काळे, शेखर काटे, शिरीष आप्पा साठे, शाम जगताप, बापु कातळे, सचिन काळे, तानाजी जवळकर, चद्रकांत तापकीर, नवनाथ नढे, प्रशांत सपकाळ, प्रसन्न डांगे, फजल शेख, सनी ओव्हाळ, प्रसाद लिमण, अमोल राऊत, सागर कोकणे, संगीता कोकणे, आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना काटे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चा केली. दरम्यान, चिंचवड मधील एकूणच सर्व परिस्थितीबाबत कार्यकर्त्यांच म्हणणं एकूण घेतलं आहे. त्यावर विचार करुन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवाळी निमित्त बारामतीला जाताना मला भेटायला आले होते, असे सांगत आपण निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे नाना काटे यांनी सांगितलं आहे.
About The Author
