पिंपरी : प्रतिनिधी
शांती व आपल्यासारख्या अहिंसेच्या उपासक असलेल्या उमेदवारच विजयी होतील असा आशीर्वाद जैन साध्वींनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना दिले. जैन चातुर्मासाच्या निमित्ताने जैन साध्वी डॉ. राजश्रीजी म.सा., डॉ. मेघाश्रीजी म.सा. ,समीक्षश्रीजी म.सा. व जिज्ञासाश्रीजी म.सा. हे गुरुवर्य आकुर्डी येथील वर्धमान जैन श्रावक संघ येथे उपासणेसाठी आले आहेत. पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी बोलताना डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की जैन बांधव नेहमीच समाजाच्या मदतीसाठी धावून जात असतो, भगवान महावीरांच्या अहिंसा, शांतता, समता, बंधुता, या तत्त्वांचे पालन करीत असतो.या जैन समाजाच्या समाज उपयोगी कामाचे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास श्रीवर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री. सुभाषजी सुगनमलजी ललवाणी, उपाध्यक्ष विजयजी कणकमलजी गांधी, महामंत्री राजेंद्र जी पुनमचंदजी छाजेड, नि.अध्यक्ष जवाहरलालजी गौतमचंदजी मुथा, विश्वस्त पोपटलालजी रामचंद्रजी कर्णावट ,दिलीप जी मोहन लालजी फिरोदिया ,मदनलालजी इंद्रभान जी कोचर, नितीनजी हिरालालजी छाजेड, सचिनजी राजकुमार जी गांधी, श्रीमती मीराबाई रमेश लालजी लुनिया ,श्रीमती. ज्योत्सना बाई रतिलालजी मुथा, कोषाध्यक्ष नयनसुखजी बाबूलालजी मांडोत, सहमंत्री हिरालालजी फुलचंदजी लूणावत, पूर्वाध्यक्ष संतोषजी विठ्ठलदासजी कर्णावट, राजेंद्र जी ताराचंदजी कटारिया, धनराजजी कुंदनमलजी छाजेड, संतोषजी बन्सीलालजी लुंकड, परागजी ईश्वरजी मुथा, श्रीकांतजी श्रीमलजी नहार , सौ.शारदाबाई मोतीलालजी चोरडिया ,सौ ज्योतीजी राजेंद्रजी खिंवसरा,इखलासभाई सय्यद आधी मान्यवर उपस्थित होते.