पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांची निवडणूक कचेरी मोशीत सुरू करण्यात आली आहे. मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेजवळील या कचेरीचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोशीचे ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या जयघोषात कचेरीचे कामकाज सुरू झाले.
माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका सारिका बो-हाडे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, निखिल बो-हाडे, निलेश बोराटे, वंदना आल्हाट, सागर हिंगणे, राजेश सस्ते, गणेश सस्ते, मंगेश हिंगणे, काळूराम सस्ते, नामदेव सस्ते, रवि गायकवाड, प्रवीण बनकर, मनिषा सस्ते, राष्ट्रवादीचे विजय सस्ते, मधुकर बोराटे, संजय हजारे यांच्यासह मोशी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात कचेरीचे उद्घाटन करण्यात आले.
मागील १० वर्षांत केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमदार महेश लांडगे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने आमदार लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावातील विकास कामांना चालना मिळाली. समाविष्ट गावातील नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौरदाच्या माध्यमातून शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. २०१७ पासून समाविष्ट भागाचा झपाट्याने विकास झाला. सर्व सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या. त्यामुळे समाविष्ट भागातील नागरिक आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आमदार लांडगे यांच्या प्रचार फेरी, कोपरा सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
समाविष्ट गावांचा विकास हाच माझा राजकीय अजेंडा राहीला आहे. २०१७ मध्ये महानगरपालिका भाजपा सत्ता काळात समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मिळाली. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला. बोऱ्हाडेवाडी येथे रहिवाशी क्षेत्र वगळून टीपी स्कीम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यामुळे सर्वसमावेशक विकासाचे ध्येय दृष्टीक्षेपात आले आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी, विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.