तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
कलापिनी संस्थेत मराठी रंगभूमी दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, उपाध्यक्ष अशोक बकरे, खजिनदार श्रीशैल गद्रे, डॉ. मीनल कुलकर्णी, श्रीपाद बुरसे आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते हिमालयाची सावली, टायपिस्ट, सीता स्वयंवर या नाटकांच्या संहितांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर सीता स्वयंवर नाटकातील नांदी अरुंधती देशपांडे, संगीता देशप्रभू, मेधा रानडे यांनी सादर केली. त्यानंतर खगेश जोशी, चेतन पंडित यांनी ‘सीता स्वयंवर’ नाटकातील प्रवेश अभिवाचनातून सादर केला. संजय मालकर, डॉ. विनया केसकर यांनी वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ या नाटकातील प्रवेशाचे अभिवाचन केले. विराज सवाई यांनी ‘टायपिस्ट’ या अनुवादित नाटकातील प्रवेश सादर केला. डॉ. परांजपे यांनी मराठी रंगभूमीचा इतिहास आणि महत्त्व सांगितले.
सूत्रसंचालन सायली रौंधळ यांनी केले. प्रतिक मेहता यांनी ध्वनी योजना व्यवस्थापन, नेपथ्य केले. अंजली सहस्त्रबुद्धे, रश्मी पांढरे, अनघा बुरसे, चैतन्य जोशी, रामचंद्र रानडे, जान्हवी पावसकर आदींनी संयोजन केले.