


तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व कै. नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील काळोखे गोशाळेत दीपोत्सवातील प्रथम दिवस वसुबारस हा पारंपारिक पद्धतीने व थाटामाटात दोन्ही संस्थांच्या वतीने संपन्न झाली असून संपूर्ण गोशाळेत आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक रांगोळ्यांची सजावट, गाईंना रेशमी झुली,शिंगाना रंग व बेगड,सुंदर घुंगरमाळा व फुलहार घालून गायींना व वासरांना सजवण्यात आले होते. गोसेवक व्याख्याते दत्तात्रय सदाशिव दातार यांनी भारतीय संस्कृतीमध्ये गाईचे पौराणिक,अध्यात्मिक, वैज्ञानिक महत्व विशद करताना अनेक उदाहरणे दिली.
मनीषा काळोखे, मृणाल काळोखे, रो.शरयू देवळे, रो. वर्षा खारगे,अँन्स शारदा कदम,जयश्री काळोखे यांच्या शुभहस्ते गायींचे पूजन करण्यात आले व गाईंना गोडाचा व दिवाळी फराळाचा नैवेद्य देण्यात आला सदर प्रसंगी रोटरी सिटीचे, पतसंस्थेचे व काळोखे मित्र परिवारातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले असून सूत्रसंचालन उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले आभार सेक्रेटरी सुरेश दाभाडे यांनी मानले.
क्लब ट्रेनर दिलीप पारेख, माजी अध्यक्ष सुरेश शेंडे, नितीन शहा, संजय मेहता, हरिश्चंद्र गडसिंग,संतोष परदेशी,रामनाथ कलावडे, दशरथ ढमढेरे,विश्वास कदम, रघुनाथ कश्यप, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे,तानाजी मराठे, संजय वाघमारे, राकेश ओसवाल, विनोद राठोड,बसाप्पा भंडारी,रोट्रक्ट अध्यक्ष रोशनी ओसवाल,माजी अध्यक्ष वैभव तनपुरे इ.सह पतसंस्थेचे सचिव विश्वनाथ काळोखे, संचालक जयश्री काळोखे, संजय संदानशिव, डॉ.शाळिग्राम भंडारी पतसंस्थेचे अधिकारी व सभासद, योगा ग्रुप, गोल्डन ग्रुप इत्यादीचे सभासद व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
समाजातील सर्व स्तरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीनिमित्त भौगोलिक दृष्ट्या दुर्गम भागात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या लोकांबरोबर दिवाळी साजरा करण्याचा मानस बांधत यावर्षी इंगळून येथील आदिवासी (कातकरी) पाड्यावर आनंदाची दिवाळी साजरी केली याचा आम्हाला खूप आनंद झाला असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंदर मावळातील दुर्गम इंगळून गावातील आदिवासी (कातकरी) पाड्यावरील बांधवांबरोबर दिवाळी सण साजरा करत असताना आपल्या मनोगतातून बोलत होते.
आगामी काळात येऊ घातलेल्या हिवाळ्यासाठी येथील १५ कुटुंबांना ब्लँकेटसह, दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणती आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी अजय पाटील, संदीप मगर, दीपक बागल, पांडुरंग खांडवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाजीराव सुपे यांनी केले तर आभार भरत पवार यांनी मानले.
शरयु संतोष दाभाडे पाटील हीने लंडन येथील कोवेंन्ट्री महाविद्यालयात जागतीक व्यापार या विषयात मेरीट मधे एम.बी.ए पुर्ण केल असून तिचा पदवी प्रदान समारंभ दि.२९ ऑक्टोंबर रोजी लंडन येथील कोवेंन्ट्री महाविद्यालयात लंडंनच्या चांस्नलर डॉ. हेनी वेल्स यांच्या हस्ते पार पडला.
याबाबत शरयुचे वडील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक,शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील म्हणाले कि लंडन येथील कोवेन्ट्री महाविद्यालयात जागतीक व्यापार या विषयात एमबीए पुर्ण करून ती मेरीट मधे आल्यामुळे आम्हास खुप आनंद होत आहे.
शरायुने सामाजिक कार्य करताना कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तळेगाव येथे स्व. थोर समाज सेवक नथुभाऊ भेगडे पाटील यांच्या नावाने कोवीड सेंटर टाकल होत.तेव्हा रुग्णांना औषधे , काढा, जेवन देन्यासाठी नर्स,डॉक्टर कमी होते. दवाखान्यात जागा न्हवती, संपुर्ण दवाखाने फुल होते त्यावेळी ७ दिवस रुग्नांची सेवा केल्याने ती ७ दिवस ती कोरोंटाईन मध्ये होती.यामुळे तिच्या कार्याची दाखल घेऊन तिला कोरोनायोद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला होता.लंडनमध्ये तिने राहुन मेरीट मधे एम.बी.ए पूर्ण केल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.