पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
चिंचवड मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर थेरगाव, पिंपळे निलख, सांगवी विविध परिसरात पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दागिने, मोबईल हिसकावने, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या व इतर घटनामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगवी पोलिसांना निवेदनाद्वारे दिली आहे.
या भागात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणत उच्चभृ मोठ्या सोसायट्या आहेत त्यातील नागरिक वॉकिंग, खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत येत असतात व तसेच छोटे मोठे हॉटेल व इतर व्यवसाय असून, रात्री त्यातील कामगार, मालक घरी परतत असताना त्यांना या चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्या कडील मोबईल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या मध्ये याबाबत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाना काटे यांनी पोलीस निरीक्षक यांना आपण नमूद केलेल्या घटनेचे गांभीर्याने बघून योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच आपल्या पोलीस ठाणे हद्दी परिसरात नाकाबंदी व पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी व या चोरीच्या होणाऱ्या घटनेवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.
About The Author

