Spread the love

मावळ : प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ला विसापूर हा शतकांन शतके जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत .एकीकडे लोहगड हा जागतिक वारसा मध्ये लवकर त्याची नोंद घेतली जाईल तर त्याच्या समोरील विसापूर किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भक्कम तटबंदी ही विसापूर किल्ल्याची ओळख आहे. विसापूर किल्ला हा मावळातील सर्वात मोठा किल्ला म्हणून याचा उल्लेख करता येईल. मोठ-मोठे राजवडे मोठ्या प्रमाणावरील पाण्याचे टाके, दारू गोळा कोठारे, धान्य कोठारे, विहिरी, शिवमंदिर, हनुमानाच्या दगडातील मुर्त्या ,गणपती मूर्ती, मोठी जाती ,तटबंदी, बुरुंज , आजूबाजूला पडलेल्या ऐतिहासिक वस्तू, तोफा, तोफ गोळे एक ना अनेक महत्त्वपूर्ण इतिहास विसापूर किल्ल्यावर आहे. इतिहासामध्ये पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिलेल्या किल्ल्यामध्ये लोहगड विसापूर किल्ल्यांचा उल्लेख आहे.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आज दुर्लक्षित आहे. तो टाहो फोडतो आहे की मला पुन्हा एकदा वैभवशालीतेकडे घेऊन चला. देश स्वतंत्र होऊनआज 75 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा आमचे अनेक गडकोट किल्ले हे विसापूर किल्ल्याप्रमाणे जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. ही एक शोकांतिका आहे असा उल्लेख संस्थापक सचिन टेकवडे यांनी केला. विसापूर किल्ल्यावर आपण लोहगड मार्गे तसेच पाटण गाव मार्गे प्रवेश करू शकतो. विसापूरचे दोन्ही प्रवेशद्वारे पूर्णपणे नामशेष झालेले आहेत. त्या ठिकाणी आता भक्कम बुरुंज व त्यात भक्कम दरवाजे बसविने आवश्यक आहे. हे पुन्हा या किल्ल्याची शोभा वाढेल याची दखल सरकारने घेणे आवश्यक आहे असे मत श्री सचिन टेकवडे यांनी व्यक्त केले.

विसापूर किल्ल्यामध्ये प्रत्येक सोमवारी मंचाचे कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर, मुकुंद तीकोने ,चेतन जोशी हे किल्ल्यावर जाऊन अभिषेक करतात. विसापूर किल्ल्याला पुन्हा वैभवशालीतेकडे नेण्यासाठी संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर ,सचिन निंबाळकर, चेतन जोशी, अजय मयेकर ,गणेश उंडे, बसप्पा भंडारी ,अमोल गोरे, ओंकार मेढी, सर्व पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थ असे अनेक कार्यकर्ते या साठी प्रयत्न करत आहेत करत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *