तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
श्री गणेश मोफत वाचनालयात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिनेश कुलकर्णी यांनी सरस्वती पूजन व संविधान पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
संस्थेचे संचालक श्री प्रशांत दिवेकर यांनी उपस्थितांना संविधानाची मूलभूत माहिती दिली.संविधान पूजन करून आदर्श नागरिक बनणे,हाच खरा संविधान दिनाचा उद्देश आहे,असे त्यांनी सांगितले. यावेळी अभ्यासिकेतील रागिणी परांडे या विद्यार्थिनीने संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
या कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक, अभ्यासिकेतील विद्यार्थी, कर्मचारी वृंद आणि वाचक उपस्थित होते.