पीडित कुटुंबाची न्यायाची मागणी
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदोरी बायपास या ठिकाणावरील हॉटेल जय मल्हार येथे पीडित मयताचे वडील अशोक निवृत्ती पवार यांचा मुलगा प्रसाद उर्फ किरण अशोक पवार वय 27 याचा खून करण्यात आला व त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र जखमी अवस्थेत अभिषेक अशोक येवले हा त्यात नुकताच बचावला. सदर घटना 26 नोव्हेंबर 2024 रोजी घडली असल्याची माहिती दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथील हॉटेल घरोंदा या ठिकाणी पत्रकार परिषद घेत दोन्ही पीडित कुटुंब पवार व येवले यांनी दिली.
हॉटेल जय मल्हर यातील हॉटेलचे मॅनेजर यांच्यासोबत मयत प्रसाद उर्फ किरण अशोक पवार व त्याचा मित्र जखमी अवस्थेत अभिषेक अशोक येवले यांची बाचाबाची झाली होती. या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन अखेर हॉटेल मालक अक्षय दत्तात्रय येवले, विश्वास दत्तात्रय येवले, अभिषेक बाबाजी येवले, वैभव गणपत मांडेकर, हर्षद रामदास पिंगळे व इतर दोन अनोळखी साथीदार यांच्या मदतीने प्रसाद उर्फ किरण अशोक पवार व अभिषेक अशोक येवले या दोघांचा खुनाचा कट रचला गेला होता. हॉटेल मालक अक्षय येवले यांनी फोन करून हॉटेलवर झालेल्या किरकोळ बाचाबाचीच्या बाबतीत चर्चा करायची आहे. आपण सर्व एकाच गावातले आहोत, असे सांगून मयत प्रसाद उर्फ किरण पवार व अभिषेक येवले या दोघांना रात्री हॉटेलवर बोलवून घेतले व हॉटेलची लाईट बंद करून सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून अभिषेक येवले यांच्याशी बोलण्याचा बहाना करून पाठीमागून त्याच्यावर वार करत तो पळाल्याने मयत प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याला गाडीच्या काचा फोडून बाहेर काढून हल्ला करत त्याचा खून केला, अशी माहिती मयताचा मिञ अभिषेक अशोक येवले यांनी दिली.
सदरची घटना रात्री साडेनऊ ते साडे अकराच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी होते ते कोण होते. अद्याप त्यांची नावे समजली नाहीत, मात्र या हल्ल्यामध्ये बचावलेला मयताचा मित्र अभिषेक अशोक येवले हा जखमी अवस्थेत असून याने घडलेला संपूर्ण प्रकार हा पत्रकार परिषदेमध्ये सर्वांसमोर मांडला तसेच मयताचे वडील अशोक पवार यांनी देखील त्यांच्यासोबत घडलेली आपबीती पत्रकारांसमोर मांडली. मयताचे वडील यांच्यावर दबाव तंत्र सुरू असून सुरुवातीपासून आरोपीला फिर्यादीची वागणूक व मयताचे वडील अशोक पवार यांची बेसावध मुलाची मयत देखील नकरता सुरवातीलाच फिर्याद करुन ठेवुन सही घेतली व नंतर मुलगा मेल्याची माहिती दिली असून यांनी या घटनेला कुठेही वाचा फोडू नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. व आरोपी सात असताना एकच आरोपी अटक कसा केला व त्याला लगेच येरवडा कसे पाठवले कोणताही तपास न करता असा आरोप पत्रकार परिषदेत फिर्यादी अशोक पवार यांनी केला.
सुरुवातीपासून तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इंदोरी भागातील पोलीस उपनिरीक्षक यांनी आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप देखील पीडित कुटुंब पवार व येवले यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात त्यांनी पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री तसेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रश्मी शुक्ला मॅडम यांच्याकडे पत्रव्यवहार करत सर्व माहिती कळवली, असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, आज सकाळी पोलीस कमिशनर यांच्या कार्यालयात बोलावले असता पोलीस तपास अधिकारी आम्ही बदलू व तुम्हाला सहकार्य करू, असे पोलीस कमिशनर यांच्या दालनात सांगितल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तपास देऊ असे सांगितले. त्यावर तळेगाव एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या पोलिसांवर आमचा विश्वास नाही. दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे तपास द्या, अशी मागणी दोन्हीही पीडित कुटुंबाने पोलीस आयुक्तांकडे केली पोलिसच जर रक्षकचे भक्षक बनत असतील तर सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्माण होत आहे. यावर पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. तसेच मयत प्रसाद अशोक येवले याच्या सर्व मारेकऱ्यांना पोलीस अटक करणार का? सुरुवातीपासून तपास करणार का?असा प्रश्न पीडित कुटुंबाने निर्माण केला आहे.
यावेळी अभिषेक अशोक येवले (जखमी मिञ), अशोक येवले(जखमीचे वडील), प्रतिभा अशोक येवले(जखमीचे आई), अशोक निवृत्ती पवार (फिर्यादी/मयताचे वडील), सुशीला अशोक पवार (मयताची आई), सतीश दशरथ पवार(मयताचा भाऊ) उपस्थित होते.