लोणावळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पोलिसांना निवेदन; कडक कारवाईची केली मागणी
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक, शाळा प्रशासन, आणि पालकांकडून शाळा आणि महाविद्यालयातील परिसरात विद्यार्थ्यांदरम्यान होणाऱ्या रस्त्यावरील भांडणांबाबत तक्रारी वाढत आहेत. अशा प्रकारचे वर्तन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अप्रतिष्ठाजनक आहे आणि त्यामुळे शहराच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे.तसेच शहरातील युवकांनमधे द्वेष भावना वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात लोणावळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरद पवार अभय रविंद्र परदेशी याचे वतीने लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला निवेदन देऊन कडक कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे अध्यक्ष नासिर (पप्पू भाई शेख), वरिष्ठ नेते प्रांतिक सदस्य यशवंत बाळासाहेब पायगुडे, राजू बोराटी,संतोष कचरे , संकल्प युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विनोद होगले, शेखर वर्तक , युवक अध्यक्ष अजिंक्य कुटे , प्रवीण करकेरा, महिला अध्यक्ष श्वेताताई वर्तक, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.