तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगर रचनाकार विश्वजित कदम, भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन, मिळकत विभागप्रमुख मधुरा जोशी, संगणक अभियंता सोनाली सासवडे, लिपिक रोहित भोसले, शिला वेहळे, करसंकलन लिपिक प्रवीण माने, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, वैशाली आडकर, आदेश गरुड, मयूर डिलोड, अरविंद पुंड, विशाल लोणारी, प्रवीण शिंदे, आदेश गरुड, आशिष दर्शले, प्रकल्प अधिकारी विभा वाणी, मयूरी आडोळे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.