Spread the love

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.योगेश बहल तसेच शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बहल म्हणाले की, आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथांनी प्ररेरित केले होते. त्याकाळात महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता होती आणि ते दिनदुबळ्या जनतेला लुटत होते. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात शिवबांच्या हाती तलवार, ढाल देत युद्ध कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करून फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे गुण शिवबांना दिले होते, स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांकडून मिळाले होते आणि ते त्यांनी देखील सत्यात उतरविले, अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत, अशा या महान मातेस मानाचा मुजरा करतो.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत हा तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील, स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला, तपस्वी त्यागी वृत्तीचा प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करत स्वामी विवेकानंद यांची प्रेरण घेणे गरजेचे आहे.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फझल शेख, संतोष बारणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हणे, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश ओबीस कार्याध्यक्ष ॲड.सचिन औटे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र सिंग वालिया, अकबर मुल्ला, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गंध, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी,चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, बचत गट महासंघ महिला अध्यक्षा ज्योती गोफणे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे, आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेळके, सेवादल अध्यक्ष महेश झपके, शिक्षक सेल अध्यक्ष पवन खराडे, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटे, ‍दिपक साकोरे, लाल मोहम्मद चौधरी, उपाध्यक्ष शिरिष साठे, प्रदीप गायकवाड, गोरोबा गुजर, अभिजीत आल्हाट, रविंद्र सोनवणे, निखिल सिंह, पुष्पा शेळके, दीपक गुप्ता, लवकुश यादव, बाळासाहेब पिल्लेवार, माऊली मोरे, नीलम कदम, माधवी सोनार, वर्षा शेडगे, सपना कदम, शंकर पल्ले, सचिन वाल्लेकर, बापू मस्के, राजू चांदणे, स्वराज्य शिंदे, महेश माने, कुमार कांबळे, नागोर साहेब, आशिष कांबळे, धनाजी तांबे, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *