तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
नगर विकास विभाग व नगर परिषद प्रशासन संचालनालयाने बारामती येथे आयोजित केलेल्या पुणे जिल्हा पातळीवरील सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक व सांघिक यश संपादन केले.
बारामती येथे ९ ते १२ जानेवारी या तीन दिवसात पार पडलेल्या स्पर्धांमध्ये वैयक्तिक आठ पदके तर सांघिक पाच अशी एकूण पंधरा पदके नगर परिषदेच्या स्पर्धकांनी मिळविली. जिल्हा पातळीवर प्रथमच आयोजित केलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा नगर परिषद प्रशासन उपायुक्त दत्तात्रेय लांघी, सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रिकेट, व्हॉलिबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, समुहगायन आदी २१ क्रीडाप्रकारात आपला सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी अभिनंदन केले.
विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे – बुद्धिबळ (महिला) : मोनिका झरेकर – द्वितीय, गौरी चव्हाण – तृतीय, वैयक्तिक गायन : भास्कर वाघमारे – तृतीय, बॅडमिंटन सिंगल (पुरुष) : प्रफुल्ल गलियत – द्वितीय, राम सरगर – तृतीय, कॅरम (महिला) – जयश्री सायखेडे – द्वितीय, सोनाली सासवडे – तृतीय, कॅरम (पुरुष)- राम सरगर – तृतीय.
सांघिक स्पर्धा – समूह गायन – प्रथम, रस्सी खेच (महिला) – द्वितीय, समूह नृत्य – तृतीय, बॅडमिंटन दुहेरी (महिला) – द्वितीय, बॅडमिंटन दुहेरी (पुरुष) – तृतीय.