
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ परिसरात संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या श्रीरंग कलानिकेतनची गंधर्व सभा आणि संगीत क्षेत्रात नव्यानेच कार्यरत झालेली विकेंड युफनीं यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ परिसरातील संगीत प्रेमी रसिकांसाठी आयोजित करीत आहे. सरगम भारद्वाज व सावनी पारेकर या युवा कलाकारांची शास्त्रीय संगीताची मैफिल ‘राग रंग’ रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या मैफिलीला प्रिया करंदीकर घारपुरे (संवादिनी) व चेतन ताम्हणकर (तबला) यांची साथ संगत असणार आहे.
ही शास्त्रीय संगीताची मैफिल विनामुल्य असून तळेगाव आणि मावळ परिसरातील संगीत रसिकांनी या संगीत मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य यावे अशी विनंती श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी आणि विकेंड युफनींचे संचालक नितेश कुलकर्णी यांनी केली आहे.