तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ३० जानेवारी रोजी दरवर्षी देशभर दोन मिनिटे (मौन) स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात सकाळी ११ वाजता सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २ मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, नगर रचनाकार विश्वजित कदम, गणेश कोकाटे, वीरेंद्र नारगुंडे, शहर अभियंता राम सरगर, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक कैलास कसाब, नरेंद्र कणसे, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, मिळकत विभाग प्रमुख मधुरा जोशी, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, पाणी पुरवठा प्रमुख अभिषेक शिंदे, संगणक अभियंता सोनाली सासवडे, उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड, कर निरीक्षक मोनिका झरेकर, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, मयूर मिसाळ, तुकाराम मोरमारे, वरिष्ठ लिपिक राजश्री जगताप, ज्योती पेंडसे, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, मयूर ढिलोड, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, आनंद जाधव, अर्चना काळे, शिला वेहळे, अश्विनी गरुड, दक्षता भालेराव, गौरी चव्हाण, शहर समन्वयक गीतांजली होनमाने, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, शितल कडूसकर, अनिता कांबळे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.