पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
विश्वकर्मीय समाज पिंपरी चिंचवड शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाज बांधव माता भगिनी आयोजित भव्य रथ यात्रा व मिरवणूक सोमवार, दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजता दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या रथयात्रेच्या मिरवणुकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदीर चौक ते प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी असा असणार आहे. या भव्य दिव्य रथयात्रा व मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये वारकरी संप्रदायांमधील परंपरा जपत जवळजवळ 150 वारकरी विद्यार्थी टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये नामघोष करत या मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत.
या मिरवणुकीच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे, सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व आर्थिक सक्षमीकरण तसेच इतर बाबतचे प्रबोधन या मिरवणुकीच्या माध्यमातून विश्वकर्मीय समाज पिंपरी चिंचवड शहर सामाजिक संस्था करणार आहेत.
या मिरवणूकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदिर निगडी चौक प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुना नगर आहे. महाप्रसादाची वेळ रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत असणार आहे. महाप्रसादाचे स्थळ प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी येथे असणार आहे. या भव्य रथयात्रा व मिरवणुकीला भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे, तसेच विधानपरिषद आमदार अमित गोरखे, तसेच पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या परिसरातील म्हणजेच, खेड आंबेगाव जुन्नर मावळ मुळशी लोणावळा या परिसरामधील समाज बांधव माता भगिनी ह्या भव्य रथयात्रा मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सृष्टीचे सृजन कर्ता म्हणजेच विश्वाचे पहिले शिल्पकार व वास्तुकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, सदर प्रभु विश्वकर्मा जयंती माघ शुद्ध 13 दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील गावोगावी साजरी केली जाते.