Spread the love

विद्यार्थ्यांना ७ लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा अकादमीतर्फे ‘LPJ इनोव्हेशन अवॉर्ड-२०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशील आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील 5000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यंदा या स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 12 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.

ही स्पर्धा इयत्ता ७ वी ते ९ वी, इयत्ता १० वी ते १२ वी आणि पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) अशा तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. यात वैयक्तिक व सांघिक अशा स्वरूपात विद्यार्थ्यांना एकूण ७ लाख रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांनाही त्यांच्या स्वप्नातील शाश्वत शहर कसे असावे यासंदर्भात कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतून शहरातील रहदारी, पायाभूत सुविधा, आपत्ती व जल व्यवस्थापन, स्मार्ट सिटी संकल्पना, ई-गव्हर्नन्स, डिजिटलायझेशन, पर्यावरण, महसूल, आरोग्य, संस्कृती आणि वारसा यासारख्या विषयांवर नावीन्यपूर्ण उपाय सुचविणाऱ्या ३२ सर्वोत्तम कल्पनांना प्रोत्साहन व निधी दिला जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी कसे व्हावे? – स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प, पीपीटी, व्हिडीओ किंवा संकल्पना www.lpjfoundation.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपलोड कराव्यात.

शेवटची तारीख – स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी व प्रकल्प सादर करण्याची अंतिम तारीख १२ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 7058927700 / 9307262906 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *