Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

रावेत येथील सिल्वरलँड रेसिडेन्सी फेज १ आणि २ सहकारी गृहरचना संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने प्रतिस्पर्धी सिल्वहरलॅंड परिवार पॅनेनचा धुव्वा उडवून दणदणीत विजय मिळविला. या मुळे या सोसायटीवर परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.

या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि सिल्व्हरलँड परिवार पॅनल यांच्यात थेट लढत झाली होती. यामध्ये परिवर्तन पॅनलच्या सर्व १९ उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत सिल्व्हरलँड परिवार पॅनलचा दारुण पराभव केला. निकालानंतर सर्व विजयी उमेदवार आणि सभासदांनी गुलालाची उधळत विजयी जल्लोष साजरा केला. परिवर्तन पॅनलच्या विजयात सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. या वेळी दीपक भोंडवे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

विजयी उमेदवारांमध्ये सावंत अजय अशोक, टिकू विमल, डुंबरे सागर प्रदीप, दासरी श्रीनिवास राजेशाम, देशपांडे श्रीकांत गजानन, पाटील राहुल अशोक, पाठक अजिंक्य संजय, प्रकाश अनुभव, भट राहुल, मदन कुमार, कुमार शैलेंद्र, सिंहदेव शिलाभद्र, सुमन सौरभ सदानंद, सोनी नरेंद्र, गेडाम रीमा शैलेश, लाल जुली, वारे गणेश जगन्नाथ, नवले श्रीकांत प्रकाश, नुगुरवार आशिष यादवराव आदींचा समावेस आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *