

भोसरी : प्रतिनिधी
चऱ्होली फाटा आझादनगर ते वडमुखवाडी- काळजेवाडी ताजणे मळापर्यंतच्या 18 मीटर डीपी रस्त्याचे कै. रामभाऊ तुकाराम तापकीर रस्ता असे नामकरण करण्यात आले असून याबाबतच्या नामफलकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
महापौर नितीन काळजे व भाजपा कोषाध्यक्ष सचिन श्रीधर तापकीर यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन पार पडले. यावेळी आळंदीचे नगरसेवक प्रदीप बवले, युवा नेते सुनील काटे, माजी स्वीकृत सदस्य अजित बुर्डे, अनिकेत तापकीर, तात्या तापकीर, सागर दाभाडे, रवी तापकीर, नितीन गिलबिले, अॅड. मयूर तापकीर, वैभव तापकीर, सोमनाथ तापकीर, शुभम तापकीर, गणेश गिलबिले, प्रमोद तापकीर,अक्षय काळोखे रवी तापकीर, नितिन गिलबिले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. वडमुखवाडी येथील वै. रामभाऊ तापकीर हे जुन्या पिढीतील शेतकरी होते. तसेच ते वारकरी कुटुंबातील होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चऱ्होली येथील चोविसावाडी – वडमुखवाडी ते काळजेवाडी ताजणे मळापर्यंतच्या 18 मीटर डीपी रस्त्याचे कै. रामभाऊ तुकाराम तापकीर रस्ता असे नामकरण केले आहे.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते वैभव तापकीर, कृष्णाजी दाभाडे सरकार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर दाभाडे यांनी पाठपुरावा केले. तर आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, भाजप कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे नामकरण करण्यात आले.