

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, शहर अभियंता राम सरगर, लेखापाल जयश्री साईखेडे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, संगणक अभियंता सोनाली सासवडे, कर निरीक्षक मोनिका झरेकर, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुलेतुकाराम मोरमारे, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, आनंद जाधव, शिला वेहळे, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, शितल कडूसकर, अनिता कांबळे आणि तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होता.