
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
नवी सांगवी येथे प्रभाग क्रमांक 45 मध्ये रस्त्याचे काम चालू असताना त्रिमूर्ती कॉलनी देवकर क्षयपथ नवी सांगवी येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने १ तास पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात आला होता. नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्ष चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची संपूर्ण माहिती दिली.
यावेळी मेघराज लोखंडे (चिंचवड विधान अध्यक्ष सभा), राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांना माहिती मिळतच त्यांनी तात्काळ म.न.पा (ह) क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती देत ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलून काम करून घेतले. अवघ्या अर्ध्या तासात पुर्णपणे कामे पूर्ण करून घेतले. यावेळी रोहन चौधरी, स्वयम अशोक जाधव व चैतन्य शिंदे उपस्थित होते.