


महिला दिनानिमित्त मदरहुड हॉस्पिटल यांनी खराडी विमेन्स ऑर्गनायझेशनचा उपक्रम
पुणे : प्रतिनिधी
मदरहुड हॉस्पिटल यांनी खराडी विमेन्स ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने स्थानिक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमात ५० हून अधिक महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला, ज्याचा उद्देश महिला आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि संभाव्य आरोग्य समस्यांचे लवकर निदान करणे हा होता.
या शिबिरात पॅप स्मीअर चाचण्या, मोफत स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लामसलत तसेच एचपीव्ही आणि फ्लू लसीकरण यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय, तज्ञांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये समतोल कसा राखावा याविषयी मार्गदर्शन केले.
महिला आरोग्याचे महत्त्व सांगताना मदरहुड हॉस्पिटल, खराडी येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मानसी शर्मा म्हणाल्या, “महिला पोलिस अत्यंत सक्रिय आणि तणावपूर्ण जीवनशैली जगतात. बहुतांश वेळा त्या आपले कर्तव्य पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. जीवनशैलीशी संबंधित आजार, पुनरुत्पादक आरोग्य समस्या आणि तणावजन्य आजार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि जागरूकता आवश्यक आहे. हा उपक्रम त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जावी यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण म्हणाले,”महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या आरोग्यासाठी मदरहुड हॉस्पिटल पुढे सरसावलेले पाहून आनंद होतो. खराडी महिला असोसिएशनच्या सहकार्याने राबवलेल्या या उपक्रमामुळे समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिलांना आवश्यक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल.”
डॉ. (Hc) सरवजीत किराड, खराडी विमेन्स ऑर्गनायझेशन आपली भावना व्यक्त करताना सांगितले,”कठीण आणि जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. या उपक्रमाद्वारे, त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची हमी देण्याचा प्रयत्न आम्ही केला. महिला आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत भागीदारी करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला पोलिसांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक करणे आणि त्यांना वेळोवेळी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यास प्रवृत्त करणे हा होता, जेणेकरून त्या त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांबरोबरच स्वतःच्या आरोग्यालाही प्राधान्य देतील.
मदरहुड हॉस्पिटल्स विषयी
मदरहुड महिला आणि बालरोग हॉस्पिटल नेटवर्क हे भारतामधील सर्वात वेगाने वाढणारे एकल-विशेषता असलेले रुग्णालय नेटवर्क आहे, ज्यामध्ये १२ शहरांमध्ये २३ हॉस्पिटल्स आणि १,००० हून अधिक आघाडीचे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात तज्ज्ञ कार्यरत आहेत.
मदरहुड हॉस्पिटल्स त्यांच्या उत्कृष्ट क्लिनिकल कौशल्यासाठी आणि संपूर्ण महिला आणि बालकांच्या आरोग्य सेवेसाठी ओळखले जातात. ही आरोग्य सेवा साखळी जोखमीच्या गरोदरपणाचे व्यवस्थापन, क्लिष्ट स्त्रीरोग शस्त्रक्रिया, प्रजननक्षमतेशी संबंधित उपचार आणि युरो-गायनॅकोलॉजिकल प्रक्रिया यामध्ये विशेष कौशल्य ठेवते.
याशिवाय, नवजात आणि कमी जन्म वजन असलेल्या बाळांच्या उपचारांमध्येही हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. २०० हून अधिक नवजात अतिदक्षता युनिट (NICU) बेड्ससह, मदरहुड हॉस्पिटल्स भारतातील गुंतागुंतीच्या अकाली जन्म घेतलेल्या बाळांसाठी अग्रगण्य रेफरल केंद्र म्हणून ओळखले जाते.