

टिजीएच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचा उपक्रम
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील टिजीएच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने चाकण येथील किड्स झोन प्रीस्कूल येथे कर्करोग प्रतिबंध जागरूकता आणि तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या महत्त्वाच्या कार्यक्रमात सुमारे ६० महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी डॅा सिमरन थोरात यांनी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी केली तर समुपदेशन एकता महाडिक यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
कर्करोग लवकर ओळखणे, प्रतिबंध करणे आणि उपचार करणे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी याठिकाणी खास शिबीर राबविण्यात आले होते. यामध्ये कर्करोग तपासणी, गर्भाशय तसेच स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करते उपस्थित महिलांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. टिजीएच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने नागरिकांमध्ये जागरूकता पसरवली जात असून कर्करोग प्रतिबंधासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात.