


पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सुमारे १००० श्रीसदस्य मोहिमेत सहभागी; अभियानाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेबाबत जागरुकतेचा संदेश
देहू : प्रतिनिधी
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी श्रीक्षेत्र देहूगाव आणि भंडारा डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत आज सकाळी ६ ते ८ या अवघ्या दोन तासांच्या कालावधीत अवघ्या दोन तासांत श्रीक्षेत्र देहू परिसर , मंदिर परिसर,ईंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता. श्रीसदस्यांनी सुमारे १६ टन कचऱ्याचे संकलन केले. यामध्ये २ टन ओला कचरा आणि १४ टन सुका कचरा संकलित करण्यात आला. यावेळी गाथा मंदिर ते मुख्य कमानपर्यंत दुतर्फा रस्त्याची व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता या अभियानात करण्यात आली.
भारताचे स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आज देहूगाव याठिकाणी घेण्यात आले. या अभियानात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील सुमारे १००० श्रीसदस्यांनी सहभाग नोंदवला.
“स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला बळ देत, सर्व श्रीसदस्यांनी देहूतील मुख्य मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट परिसर, गाथा मंदिर तसेच भंडारा डोंगरातील पवित्र स्थळे स्वच्छ केली. त्याचबरोबर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली.