Spread the love

मुंबई : प्रतिनिधी

दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी व माननीय आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततांचा आणि वोट चोरीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे.

रोहित पवार बोलताना म्हणाले की, राज्यभरातील मतदार याद्यांमधील घोळ, अवैध पद्धतीने मतदारांची झालेली वाढ व दुबार नावं या सर्व तांत्रिक बाबी आणि विशेषत: कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदारांची झालेली शंकास्पद वाढीचा PPT च्या माध्यमातून उलगडा केला आणि राज्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर पुराव्यांसहित प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असतानाही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देवांग दवे यांच्याकडे आयोगाच्या वेबसाईटचे नियंत्रण आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आयोगावर विश्वास राहिलेला नाही,असे रोहित पवार बोलताना म्हणाले.

एका संकेतस्थळावरून १२३४५६७८९०१२ या क्रमांकाचे आधार कार्ड काढण्यात आले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प तात्या हे नाव, फेटा घातलेला ट्रम्प यांचा फोटो, घर क्रमांक – ००७, गल्ली – पांढरा बंगला, गाव – राशीन, जन्मतारीख – १८२५, लिंग – स्त्री आदी अशी माहिती या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. त्यानंतर अर्ज फी ऑनलाईन २० रुपये भरल्यानंतर ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार झाले. याच आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली जाते. अशाचप्रकारे बोगस आधार कार्डच्या आधारे अधिकारी डोळेझाकपणे नोंदणी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.

 

रोहित पवार म्हणाले की, केवळ घरचा पत्ता बदलून तीनदा मतदारयादीत नावे आली. एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱया ठिकाणी पुरूष म्हणून नोंदणी करण्यात आल्याचे पुरावे रोहित पवारांनी दाखवले. मतदारयादीत असे अनेक घोळ असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

 

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकशाहीचा गळा दाबला जाणार असेल तर, ते आम्हाला मान्य नाही. मतदार याद्यांमध्ये जर असे घोळ असतील तर निवडणुका कशासाठी घेता?निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करण्याची जबाबदारी दवे यांच्याकडे दिली गेली. आमच्याआधी दवेकडे सगळी माहित होती. काय घालायचे, डिलीट करायचे काम दवेंनी उमेदवारांना हाताशी धरून केले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारवाढीचे विश्लेषण, क्रॉफ व्हेरिफिकेशन केले असल्यास त्याची माहिती, वाढलेल्या मतदारांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली आहे व हा विषय राज्यभरातील जनतेला पटवून देण्यासाठी आम्ही भविष्यात काम करणार असेही रोहित पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *