Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

पवना धरणात ६६.४९ टक्के पाणी साठ्याची नोंद झाल्याची माहिती शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची व मावळ तालुक्याच्या काही भागात तहान भागविणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिलेल्या माहिती नुसार, धरण परिसरात बुधवारी २ जुलै२०२५ रोजी जोरदार पाऊस झाला. २४ तासात धरण क्षेत्रात ९४मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आज पर्यंत पवना धरण क्षेत्रामध्ये १०२२ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेर केवळ ३१५ मिमी पाऊस झाला होता व धरणात सुद्धा १८.३८ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता.

यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली आहे. संपूर्ण जून महिना मावळात पाऊस पडत राहिल्याने तालुक्यातील सर्वच धरणे जवळपास भरली आहेत. वडिवळे व कासारसाई या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मावळातील सर्व धरणे शंभर टक्के भरतील अशी स्थिती आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *