
पुणे : प्रतिनिधी
आर्ट बिटस् फौंडेशन पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक तरुण चित्रकारांच्या विविध चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे येत्या ३, ४, ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन कला रसिकांना विनामूल्य पाहता येईल, अशी माहिती आर्ट बिटस् फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रसिद्ध चित्रकार दीपक सोनार यांच्या हस्ते होईल. या निमित्त ५ ऑगस्ट रोजी पुण्यातील अभिनव चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक व चित्रकार सतीश काळे यांचे ‘दृश्य आणि विचार’ या विषयावर कलाविषयक व्याख्यानाचे करण्यात आले आहे.
जेष्ठ चित्रकार व लेखक डॉ. सुहास बहुलकर, डॉ. अमृता देसरडा, प्रसिद्ध चित्रकार डॉ. आर. बी. होले, प्रसिद्ध शिल्पकार जितेंद्र सुतार आदी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील आर्ट बिटस् फौंडेशनचे हे २५ वे वर्ष असून, येत्या सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान सर्व प्रकारच्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
About The Author
