Spread the love

पुणे : प्रतिनिधी

मतदानांनतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सॲप वरुन एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारीत होत असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 

प्रसारीत होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे.

 

त्या अनुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवारास दर्शवित असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदारास निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ४९ एमए अन्वये चाचणी मतदान करणेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतुद आहे. तसेच सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंड सहिता कलम १७७ अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचेदेखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *