Spread the love

सदस्यांसह फेरीवाला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट

पुणे : प्रतिनिधी

लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी आधुनिक पद्धतीने हॉकर झोन निर्माण व्हावे, सर्व सोयी सुविधांनी युक्त भाजी मंडई निर्माण व्हावी, यासह विविध मागण्या घेऊन लोणावळा नगर विक्रेता समितीच्या नवनियुक्त निवडून आलेल्या सदस्यांनी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली. व लोणावळा येथे भेटून ही मागणी करण्यात आली.

 

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात हे सदस्य आमदार शेळके यांना भेटले. त्यामध्ये सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून निवडून आलेल्या निर्मला वसंत पांगारे.अनुसूचित जाती मधून अशोक राम कदम, सर्वसाधारण पुरुष मधून गणेश चव्हाण, संदीप पोटफोडे आदींचा समावेश आहे. तसेच बिनविरोध निवड झालेल्या गटात सुजाता म्हाळसकर, मुस्कान शेख, आकाश परदेशी आदी नवनियुक्त सदस्यांचा समावेश होता.

 

माजी नगरसेवक रमेश गायकवाड,नीखील कविश्वर, जिवन गायकवाड,नरेश कोंबडे,अविनाश कदम, लक्ष्मण दाभाडे, जयेश देसाई, बाबुभाई शेख,रमेश म्हाळसकर, रिक्षा पंचायत लोणावळा शहराध्यक्ष आनंद सदावर्ते निवृत्त पोलीस अधिकारी सदामामा पिरगणवार, दादाराव , गणेश पांगारे, ताजुभाई शेख, महादेव जगताप,नरेश गुप्ता, लक्ष्मिबाई सुर्यवंशी,आनंद पुजारी, बाबा ओव्हाळ , युवा नेते धनंजय काळोखे,संदिप कालेकर, सतीश डोयरे,जाॅन जाधव उपस्थित होते.

 

लोणावळा नगरपरिषद, नगर पथ विक्रेता निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. टपरी, पथारी, हातगाडी, पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ही निवडणूक लढविण्यात आली. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व लोणावळा शहराध्यक्ष वसन काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीमधील चार सदस्यांची मोठ्या मताधिक्याने निवडून आले, तर तिन जन बिनविरोध झाले,असे ऐकून सात उमेदवार विजय झाले,

 

लोणावळा हे पर्यटन स्थळ असून पर्यटना बरोबरच फेरीवाल्यांचाही विकास झाला पाहिजे आधुनिक पद्धतीने हॅकर्स झोन व भाजी मंडई निर्माण झाली पाहिजे, तसेच फेरीवाल्यांचे विविध न्याय मागण्यासाठी नवनियुक्त सदस्य काम करतील असे मत बाबा कांबळे यांनी व्यक्त केले,

 

आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरांमध्ये टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या प्रश्नांवर पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच हॉकर झोन निर्माण करण्यासाठी लागणारा निधी, शहरातील जागा निश्चित करणे, याबद्दल पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *