पिंपरी : प्रतिनिधी
ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो चालक आणि मालक यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो चालक आणि मालक फेडरेशनच्या वतीने पुणे ते दिल्ली ड्रायव्हर जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १ जानेवारीपासून या यात्रेला पिंपरी चिंचवड पुणे येथून सुरुवात होणार आहे. या मध्ये देशभरातील चालक, मालक सहभागी होणार आहेत.
दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन होणार असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, ही यात्रा 1 जानेवारी 2024 रोजी पुण्यातून सुरू होणार आहे. 3 जानेवारीला दिल्लीला देशभरातील सर्व चालक मालक यांच्या सहभागासह पोहोचेल. महाराष्ट्र येथून हे रॅली निघणार असून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब मार्गे दिल्ली येथे पोहोचणार आहे. दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 रोजी आंदोलन होणार आहे. या राज्यातील सर्व वाहन चालकांना, संघटना यांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे. रॅलीत सहभागी असणाऱ्यांचे स्वागत करा. गाव आणि प्रवासात सामील व्हा. चालकांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ड्रायव्हर जोडो यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.
संघटनेच्या मागण्या-
1) अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा.
2) देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
३) राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.
4) सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा.
५) दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे.
देशभरामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सह सर्व प्रकारचे 25 करोड चालक-मालक ड्रायव्हर आहेत. या घटकांना कोणती सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावि. यासाठी केंद्र सरकारने वेल्फर बोर्ड स्थापन करावा. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन केला पाहिजे. यश मागणीसाठी ही यात्रा काढणार आहे. या मध्ये देशभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढणार आहे.
– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो चालक मालक फेडरेशन