पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांसह मध्यवस्तीतील अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्याचा संकल्प असून, त्यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीएमआरडीए अशा अस्थापनांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
इंद्रायणीनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीकृष्णपुरम ते लांडगेनगरला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, राजर्षि शाहु महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश लोंढे, शिवराज लांडगे, योगेश लांडगे, हिरामण लांडगे, शेखर लांडगे, संतोष लांडगे, रमेश लांडगे यांच्यासह स्थानिक नागरिक व उद्योजक उपस्थित होते.
तसेच, प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वयाअभावी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कृष्णपुरम येथे लांडगेनगर ते इंद्रायणीनगरला जोडणाऱ्या ३० मीटर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. आमदार विशेष निधीतून हे काम करण्यात येत आहे. दरम्यान, गुरूविहार कॉलनी येथील सर्वात जुने गणेश मंदिरासाठी सभामंडपाचे छत नादुरूस्त झाले होते. त्यामुळे कॉलनीतील सभासदांनी सदर सभामंडप नवीन उभारावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर कामाला सुरूवात झाली. आमदार स्वनिधीतून या कामाला गती देण्यात आली. त्यामुळे नागरिक व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्प्लेंडीड पार्क रस्त्याचे काम सुरू…
दरम्यान, स्पेंडीड पार्क, डुडूळगाव येथील रस्त्याचेही भूमिपूजनही आमदार लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता विकसिक करण्याबाबत नागरिकांनी मागणी लावून धरली होती. त्याला अखेर यश मिळाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी रमेश वहिले, योगेश तळेकर, सचिन तळेकर, विक्रम वहिले, राजेश सस्ते, गणेश सस्ते, वंदना आल्हाट यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.