शहरातील सर्व शिक्षण संस्थांतील महिला वस्तीगृहावर 24 तास सिक्युरिटी गार्ड व सीसीटीव्ही बसवा
पिंपरी : प्रतिनिधी
रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख (वय ५८) आणि त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र राज्य सरकारच्या लैंगिक अत्याचारापासून वाचवण्यासाठी 2012 साली कायदा तयार करण्यात आला असून (protection of children from sexual offenses) पोक्सो कायदा याच कायद्याखाली शेख याला जन्मठेप अथवा प्रसंगी फाशीची शिक्षा द्या आणि त्या १६ वर्षीय पीडित मुलीला न्याय द्यावा. तसेच शाळेवरती कडक निर्बंध घालावेत यामुळे भविष्यात कोणताही संस्थाचालक असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही अशी मागणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
अनेकदा इज्जत वाचवण्यासाठी अनेक गुन्हे लपवले जातात. मात्र, अशा निष्ठुर व अपराधी लोकांचे मोकाट गुन्हेगारांचं फावतं ,ते उजळमाथ्याने समाजात मिरवतात. पण रावेत येथील अल्पवयीन मुलवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर येते. त्यावेळेला लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला त्याच्या मुळाशी जाऊन अशा नराधमांना कडक शासन देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो.शेख हा रावेत येथे क्रिएटिव्ह ॲकॅडमी नावाने निवासी शाळा चालवतो. लाखो रुपये भरून प्रवेश घेऊन देतो आणि शाळेतील मुलींच्या वसतिगृह इमारतीमध्येच कसा काय राहतो. पोलीस प्रशासनाने याची सर्व माहिती तपासावी त्याचबरोबर त्या संस्थेत इतर मुलींच्या संरक्षणार्थ तातडीने उपाययोजना कराव्यात. नराधम शेखसोबत संस्थेतील अन्य संचालक व कर्मचारी वर्ग यांचीही कसून चौकशी करावी.
या प्रकारामुळे तेथील इतर मुली घाबरल्याने तेथे राहण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे त्यांचे शालेय जीवन उध्वस्त होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने व महापालिकेच्या शालेय विभागाकडून संस्थेची अधिकृत माहिती तपासावी आणि त्यांच्यावर कडक निर्बंध लावावेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संस्थेमधील महिला वस्तीगृहावरती 24 तास सिक्युरटी गार्ड आणि सीसीटीव्ही बसवाव्यात आणि त्याचे कनेक्टिव्हिटी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाशी जोडण्यात यावी.