पंतप्रधानांचे निवेदन हे ट्रक,टॅक्सी चालकांच्या आंदोलनचे यश
पिंपरी : प्रतिनिधी
ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस,ट्रक चालक मालक फेडरेशनच्या आंदोलनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. देशभरात सर्व सुविधायुक्त ड्राइवर भवन निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे आंदोलनाचे यश असून, आमची एक मागणी मान्य झाली असून
इतरही मागण्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष देऊन आमच्या इतर मागण्या सोडवाव्यात असे मत बाबा कांबळे यांनी केले आहे.
या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून देशभरातील 25 कोटी
चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे लवकरच देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होणारच असे देखील बाबा कांबळे यावेळी म्हणाले
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात व इतर विविध मागण्यांसाठी 1 व 2 जानेवारी 2024 रोजी देशभरातील 25 कोटी ड्रायव्हर यांनी संप करून दि,3 जानेवारी रोजी दिल्लीत सर्व देशभरातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत जंतर मंतर येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ट्रक, टॅक्सी चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ताणामुळे अपघाताला सामोरे जावे लागते. प्रवासा दरम्यान त्यांची सोय व्हावी आणि आराम मिळावा यासाठी ड्राइवर भवन निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या भवनमध्ये स्वच्छतागृह, आरामाची, जेवणाची सुविधा निर्माण केली जाणार असल्याचे सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून ट्रक, टॅक्सी चालकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे हे यश असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. या सुविधा बरोबर इतरही मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या मध्ये देशातील 25 कोटी चालक-मालकांच्या हितासाठी हिट अँड कायदा मागे घ्यावा, सरकारने राष्ट्रीय चालक आयोग गठीत केला पाहिजे. देशातील चालक मालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी वेल्फर बोर्ड निर्माण केले पाहिजे. देशात चालक-मालकांसाठी ‘ड्रायवर डे’ साजरा केला पाहिजे. देशातील बॉर्डरवर व आरटीओ कार्यालयामध्ये होणारी चालकांची लूट आणि घुसखोरी थांबली पाहिजे. या प्रमुख मागण्यांचा देखील सकारात्मक विचार करावा अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.
देशभरातील ट्रक, टॅक्सी चालकांच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारला लवचिक भूमिका घ्यावी लागली. सद्या भवन उभारण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. आता इतर मागण्यांबाबत त्वरीत सकारात्मक तोडगा काढणे आवश्यक आहे. इतर मागण्यांसाठी दिल्ली येथील आमचा लढा चालूच राहणार आहे.
– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशन