बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या चळवळीतील मराठा संघर्ष योद्धा मा मनोज जरांगे-पाटील यांचे सहकारी मिञ व शिवसंग्राम चे नेते पांडुरंग आवारे-पाटील हे दि.19 एप्रिल 2024 रोजी बीड वरून गावी मानेवाडी कडे जात असताना चौसाळा येथे बायपासच्या लगत आसलेले प्रदीप हॉटेल चौसाळा येथे समोर मोटारसायकलवर उभारलेल्या जागेवर अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला होता.
बीड येथील रेणू हॉस्पिटलमध्ये यांना आडमिट करण्यात आले होते. आज दि.25 एप्रिल 2024 रोजी लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या गुरू प्रमाणे आसणारे बीड येथे सिव्हील सर्जन म्हणून आनेक वर्ष काम केलेले सेवानिवृत्त महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सचिव श्री.बी डी जाधव साहेब यांनी व श्री क्षेत्र नारायणगडाचे विश्वस्त मा नगराध्यक्ष मा दिलीप आण्णा गोरे यांनी पांडुरंग आवारे-पाटील यांची रेणू हॉस्पिटल बीड येथे प्रत्यक्ष भेट घेऊन आस्तेवाईक पणे विचार पुस करून अपघाता बद्दल चौकशी करून तब्येतीची काळजी घ्याण्याच्या चुचना व लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुलजी टेकाळे,अँड योगेश शेळके, सरपंच सचिन जाधव,शिवराज उगले,सचिन भड,कागदे सर व अन्य सहकारी मिञ उपस्थित होते.